दास हा हरीचा
दास हा हरीचा
गर्दीचा समुद्र पहा अनंन्ति विलीन,
चंद्रभागा पुसते आहे हे शरीर मलिन.
लाखो मुखी फक्त गजर विठुचा,
थकलो कितिही जरी मार्ग ना सुटायचा.
ताले म्रदंग ऐकूनी पावले नाचती,
वारा, ऊन, पाऊस कसे हे सोसती.
माझ्या विठुचाच जोर नसे परवा कश्याची,
भेटी साठी आतुरलो ओढ दर्शनाची.
नक्षत्र हे पावसाचे पेरण्या मनात,
अजूनही गुजतोय टाळ हा कानात.
पिढ्यानपिढ्या चाखला गोडवा वारीचा,
एकादशी पुण्य झालो दास हा हरीचा.
