STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy

दारू

दारू

1 min
279

।। दारू ।।


पहिले पहिले घेताना

खूप आवडते दारू

घेतल्यावर वागतो कसा

अंगात घुसलाय वारू


दारू प्यायला यांना

काही कारण लागते

कधी सुखाच्या प्रसंगी

तर दुःखात बसले जाते


प्रथम वेळी घेतांना 

काहीच वाटत नाही

रोजच्या बैठकीने मात्र

सायंकाळी करमत नाही


दारूच्या या व्यसनाने

जीवन होते बरबाद

अति मद्यपान केल्याने

अनेकजण झाले बाद


क्षणभराच्या सुखासाठी

दारूच्या आहारी जाऊ नको

जीवन खूप सुंदर आहे

परत बैठकीत बसू नको


दारू पिल्याने काही काळ

कळेना आपण काय करतो ?

नशेत झालेल्या चुकीचा मग

उगीच पश्चाताप करत बसतो


दारूने आतापर्यंत कोणाचे

काहीही भले झाले नाही

एक तर जातो पैसा व्यर्थ

दवाखाना ही सुटत नाही


चल वेळीच जागे होऊन

दारूपासून राहू दूर दूर

आयुष्यात वाढ होईल

जीवनात मिळेल सूर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy