STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

4  

Pandit Warade

Tragedy

दारू सोड

दारू सोड

1 min
454

प्रॉम्प्ट-८ साठी


आता तरी सोड गड्या दारू ताडी।

तरच राहील रुळावर तुझी ही गाडी।।धृ।।


भुकेली पत्नी, मुलेबाळे घरी

तरीही रोज जातोस गुत्यावरी

नाही जनाची लाज धर मनाची थोडी।।१।।


व्यसनाने वाटोळे झाले घराचे

कुत्र्यावाणी झाले हाल जीवाचे

का करतोस सुंदर शरीराची नासाडी।।२।।


वागविले नऊमास जिने उदरी

तुझ्या काळजीने झुरे बिचारी

ठेव तिच्या उपकाराची जाणीव थोडी।।३।।


बाप तुझा तुझ्यासाठी राबतो किती

वाटते का त्याची तुला जराशी भीती

कामामध्ये त्यांच्या मदत करावी थोडी।।४।।


तुझ्यासाठी जिने मायबाप सोडले

दारू पिऊन तिचे तू डोके फोडले

बायकोसाठी घेतली का एखादी साडी।।५।।


पंडित वराडे, औरंगाबाद

०९.०५.२०१९


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy