दारचा चाफा...
दारचा चाफा...
दारचा चाफा आज फुलला होता,
मात्र काहीच बोलला नव्हता.
वाट तुझी पाहून- पाहून दमला होता;
पण तुला भुलला नव्हता.
तुझ्या सुखद आठवणींनी बहरायचा
'तू' नाही याची जाणीव होताच कोमेजून जायचा,
नेहमीच तो असा बहरून,
तुझ्या विरहात झुरायचा.
त्या चाफ्याला काय ठाव, तुझा डाव.....
शेवटी कोमेजलेली फुलचं ती,
झाडालाच काय... तुलाही जडच ती.
ऊरामध्ये आहे तुझाचं गंध -तुझाचं छंद,
मनात आहे तुझ्याचं आठवणींचा तरंग.
दारचा चाफा डोकावत होता; तुझ्याच वाटेकडे
तू परत येशील या आसेकडे.
दारचा चाफा...
