चुकले कसे
चुकले कसे
सांगितला त्यांनी घराचा पत्ता
तपासून पाहिला 'गुगल मॅप'वर
वाटले आता झाले सोपे...
अगदी जवळचा रस्ता दाखवला
झालो खूष स्वतःवर
लवकरच पोचू दिलेल्या पत्यावर
पण काय..
शंभर मीटर वर रस्ताच नव्हता
झाडे झुडपे नुसतीच पायवाट
दिसली समोर..
तरी आपल्याच नादात
गुगल बाबावर अती विश्वास ठेवत
घातली गाडी त्या झुडपात...
काही समजायच्या आत
बंद पडली गाडी उलटी पालटी पडत...
दोष कोणाला देऊ आता...
नाही वापरली मी माझी विवेक बुद्धी...
काय आता माझ्या विवेक बुद्धी वापरण्यासाठी
तयार करू का एखादे अॅप?
वापरा नविन तंत्रज्ञान
पण सोडू नका आपली 'विवेक बुद्धी'वापरण्याची कास..