# colour world पिवळा
# colour world पिवळा
आनंद,स्पष्टता,उत्साहाचा असतो रंग पिवळा
पिवळा रंग ऊर्जेचा, पिवळा रंग जिज्ञासू पणाचा
रंग पिवळा प्रतिक मैत्रिचा सर्वव्यापक रंग हा पिवळा!
नववधूच्या चेहऱ्यावरचा खुलणारा रंग पिवळा
कुंकवाच्या आधी मान तिजला त्या हळदीचा रंग पिवळा
बागेमध्ये डोलणारा झेंडु आहे पिवळा
दारावर झुलणारे शोभते तोरण पिवळे
पिवळा-पिवळा सोनचाफा खुलवी सर्वांच्या मना
पसरले सारे रानभर जणु उत्साहाचे सोहळे
शोभे सुर्यफुलाचे तेज ते पिवळे
सर्व व्यापक रंग हा पिवळा!
साज पिवळा लेवुनी जणु आला वसंत पिवळा
प्रत्येकीच्या मनात भरणारा तो सोन्याचा दागिना ही पिवळा
गर्द पिवळ्या रंगाची ही मऊसुत बाभुळ फुलं
पिवळीच आहे आग आणि सुर्य ही दिसतो पिवळा
म्हणून तर आहे सर्व व्यापक रंग हा पिवळा!
खंडोबाच्या चरणी सारे वाहतो भंडारा पिवळा
श्रीकृष्ण आणि गणरायाला शोभतो पितांबर पिवळा
तेजोमय त्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावरचा सूर्यकिरण ही पिवळा
असाच आहे हा सर्वव्यापक रंग पिवळा!!!
