चंद्रयान 3
चंद्रयान 3
सारे शब्द झाले निःशब्द
दाटून आला उरी अभिमान
चंद्रावरती फडकला तिरंगा
सफल झाले आमचे चंद्रयान
इस्रोच्या कठोर परिश्रमाला
अखेर मिळाले चंद्ररुपी फळं
साऱ्या जगाला कळून चुकले
आमच्या मनगटातील बळ
भारतातील कानाकोपऱ्यातून
घुमतोय बस एकच आवाज
जाऊन पोहचलो दक्षिण ध्रुवावर
चंद्रावर आता आमचाच राज
