"शब्दांचे खेळ-भावनांची भेळ"
"शब्दांचे खेळ-भावनांची भेळ"
रणरणत्या उन्हात
मन मेटाकुटीला आलं
मृगजळामागे धावताना
चटके सोसवेना झालं
कोण आपलं कोण परक
सारे काही शब्दांचे खेळ
आपुलकीच्या नावाखाली
केली जातेय भावनांची भेळ
दडपणच्या वणव्यात
प्राण होरपळून निघतोय
वाट फुटेल तिकडे
वेड्यासारखा धावत सुटतोय
हे मायभूमी तूच आता
सैरभैर जीवाला घे सामावून
मातीतून उगवणारा
गेलाय पुरता भांबावून
स्वार्थी ह्या जगात
आपलं काही काम नाही
जगण्यात आता उरला
कोणताच राम नाही
