आयुष्याची पाने
आयुष्याची पाने
आयुष्याची एक एक पाने उलगडताना
प्रखर जाणवतं मागे वळून पाहताना
मी बनावा का तो इवलासा प्राजक्त
सुगंधी लयलूट करत होऊन जावं रिक्त
पारिजातकाची फुले हळूच उमलतात
न खुडता न आवाज करता ओघळतात
एव्हढस नाजूक आयुष्य त्यांचं क्षणभंगुर
झाडापासून मूकपणे होतात अलगद दूर
तरीही अंगणात सुगंधी सडा पसरवून
एक दिवसाचे जिवन जगतात भरभरून
अस आयुष्य लाभाव क्षणिक पण शाश्वत
पाऊलखुणा उराव्या जरी नसेल अस्तित्व
