सुखी राहण्याचा भ्रम
सुखी राहण्याचा भ्रम
आताशा तुला नाही सांगता येत आई
डोक्यावरून हात फिरव म्हणून
अस पटकन मला जमत नाही
झोपाव तूझ्या कुशित शिरून
बऱ्याच वेळा वाटत मला
करावं तूझ्या जवळ मन मोकळं
आयुष्यात नक्की काय चाललंय
सांगावं खर खर ते सगळं
किंवा मग काहीही न सांगता
निजाव मांडीवर डोक ठेवून
तोंड लपवून पदराखाली तुझ्या
घ्यावं जीवाच्या आकांताने रडून
तुला ऐकू गेलाच माझा हुंदका
तेव्हा न जाणो चुकून माकून
कोणत्या प्रकारच्या शब्दात
मी नेईल ती वेळ मारून
त्या पेक्षा नकोच ना हे सगळं
मी दुरूनच तुला बघुन हसेल
माझा सुखी राहण्याचा भ्रम
कायम मला तुझ्या डोळ्यात दिसेल
