STORYMIRROR

manisha samnerkar

Romance

3  

manisha samnerkar

Romance

चंद्रमुखी

चंद्रमुखी

1 min
236

चंद्रमुखी पाहून

तुझं नटनंथटंन

जीव वरखाली होतो

बघून तुझ मुरडनं


चंद्रासारखा तुझा

गोल गोल मुखडा

ह्दयास घाव करी

काळजाचा तुझा तुकडा


 कुंतलेत माळलाय

 सखी तू गजरा

हसरा तुझा चेहरा

 चुकवत नाही नजरा


तुला न जुमानता

पदर उडवतो उनाड वारा

नाही राहत तुझ्या

 मनावर तुझा पहारा


 बट सावरतांना

भुरभुरणा-या केसांचा पिसारा

डोळ्यांपुढे जात नाही

सुंदर तो नजारा


 नकोस राहूस

  चंद्रमुखी अबोल

 निशब्द झालो मी

 तू तर काही बोल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance