STORYMIRROR

Kanchan Thorat

Inspirational

3  

Kanchan Thorat

Inspirational

चंदनाचा टिळा

चंदनाचा टिळा

1 min
457

एक चपराक निसर्गाची,

बस असते...माणसाला

मदमस्त हत्तीला पुरे असतो,

जसा अंकुशाचा मारा...!


अवडंबर कशाचे? कशाला?

जर जायचे आहे रिक्त हाती...

आयुष्यभर साठविले तरी ...

मरणानंतर होणार मातीच!


फुकाचे कर्ज कशाला?

पाप पुण्याचा भार कशाला?

नको रातराणीची मस्ती....

नकोच अन प्राजक्त सडा !


गंधून उरावे, जीवन माझे,

जसा चंदनाचा टीळा...;

दरवळतो, जो उरात उरतो,

सजतो भाळी त्याच्या.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational