STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Children

1  

MEENAKSHEE P NAGRALE

Children

चला शाळेला शाळेला जावूया...

चला शाळेला शाळेला जावूया...

1 min
694


चला जावूया ...शाळेला जावू या

चला जावूया शाळेला जावूया...

जि.प.सुकळीच्या शाळेत जावू या..!धृ!!


हाती संगणक घेवूया

नवनवीन माहीती शोधूया

जगाची सफर करूया

डिजीटलचा उपयोग करूया

चला जावूया...शाळेला जावूया..


अवघे तंत्रस्नेही होवूया

ई-लर्निंग शिकूया

हाती लॅपटॉप घेवूया

गणित चुटकीत सोडवूया...

चला जावूया...शाळेला जावूया..


नवनवीन उपक्रम घेवूया

शै.साहित्याचा वापर करूया

ज्ञानरचनावादी धडे घेवूया

सारेच पुढे जावूया....

चला जावूया...शाळेला जावूया..


हाती मार्कर घेवूया

व्हाईट बोर्डचा वापर करूया

क्षणात चित्रे काढू या

मॅडमची शाबासकी मिळवूया...

चला जावूया...शाळेला जावूया..


आनंद मेळावा घेवूया

स्नेह भोजन करूया

सांस्कृतिक कार्यक्रम दावूया

पाऊल पहिलं...शाळेत टाकूया...

चला जावूया...शाळेला जावूया..


योगासने,प्राणायाम करूया

खेळात नंबर काढूया

हसून खेळून अभ्यास करूया

नाव शाळेचं देशात करूया...

चला जावूया...शाळेला जावूया..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children