Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.
Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.

Abasaheb Mhaske

Abstract Tragedy


4  

Abasaheb Mhaske

Abstract Tragedy


चला गड्यानो जागे व्हा

चला गड्यानो जागे व्हा

1 min 171 1 min 171

हात जोडून आले

नकटे कारभारी झाले

पडून पाया त्यांच्या

त्यांनाच डोईजड झाले


नाटकी त्यांचे वागणे असे

ओठात एक पोटात वेगळेच

ठोसर भिकारी सगळेच

दाद मागावी कोणाकडे ?


कोरोना महामारी , महापूर

भ्रष्टाचार ,महागाई , बेकारी

संधीसाधू नेते , मुजोर प्रशासक

उदासीन जनता अनाथ दीनवाणी


हेही थोर अन तेही थोर

कोण साव कोण चोर ?

धाय मोकलून कसे रडावे

कळेचना कसे जगावे ?


लोकशाहीचा राजा कफल्लक

संवेदनाहीन निरंकुश सत्ता 

डोमकावळे ,संधीसाधू बगळे

नतमस्तक सारे मीडियावाले


चला गड्यानो जागे व्हा

उघड्या डोळ्यांनी जग पहा

संतवाणी थोडी आठवा

साह्य करू एकमेका ...


Rate this content
Log in

More marathi poem from Abasaheb Mhaske

Similar marathi poem from Abstract