हिरवे हिरवे
हिरवे हिरवे
हिरव्यागार माळरानाचे ,
हिरवेगार स्वप्न,
हिरव्यागार तरुणाईला भेडसावणारा ,
हिरवाच प्रश्न ...
हिरव्या हिरव्या पानातुन झिरपणारा,
हिरवा हिरवा पाऊस ,
थेंबाथेंबातून ओथंबते,
हिरव्या मनातला पाऊस...
हिरवीच रानवाट चालणारे,
हिरवेच पाऊलं ,
जादूई जंगलाची,
हिरवीच चाहूलं ...
हिरव्यागार शेतात डोलणारे,
हिरवे हिरवे पाते,
हिरव्या हिरव्या डोळ्यांत,
हिरवेच नाते ...
हिरवीगार सृष्टी जपणारा ,
हिरवा हिरवा पाऊस,
गालावरच्या खळीला छळणारा,
हिरवाकंच पाऊस...
हिरवी हिरवी चारोळी रचली,
हिरवीगर्द झाली कविता,
कागदावरून सांडू दे खाली,
हिरवीच सरीता ...
