बस ऐवढीच इच्छा माझी
बस ऐवढीच इच्छा माझी
आवड नाही रे मला या हिऱ्या माणकांची,
तुझे पंख दे मला बस ऐवढीच इच्छा माझी ...
अनमोल या दागिन्यांचा गळ्याला फास होते,
श्वास गुदमरतात मोकळ्या आकाशात या ,
आवळलेल्या श्वासाला मोकळ कर ,
बस ऐवढीच इच्छा माझी ...
जर मिळाला जन्म दूसरा तर ,
नक्की पक्षी होईल ,
उंच उंच हिंदोळा घेईल ,
सार आकाश पिंजुन टाकील ,
एका फांदीवर विसावुन गीत गाईल,
बस ऐवढीच इच्छा माझी ...
पाठव निरोप माझा ,
सख्याला माझ्या ,
विरह हा जीवघेणा ,
मला चैन पडेना ,
यावे उडून जवळ तुझ्या,
पंख घेऊन हे उधार ,
बस ऐवढीच इच्छा माझी ...
आता असहय झालाय हा विरह,
घे निशाणी माझी तु,
सांग त्याला परतायला,
ओलावल्या डोळ्यांचे आसवे पुसायला,
स्वप्न डोक्यांत हसायला,
पानाफुलांनी बहरून यायला ,
बस ऐवढीच इच्छा माझी ...
आवड नाही रे मला या हिऱ्या माणकांची,
तुझे पंख दे मला बस ऐवढीच इच्छा माझी ...
