चल बिचल
चल बिचल
कितीसा होता भाव अंतरी
कशास झुरसी जिवनांतरी
द्वंद्व काळाशी चाले निरंतरी
वाट आंधळी असे खडतरी
अस्वस्थ करुनी मनास जरी
जावे लागते की पैलतीरी
क्षितीजापार ची निती खरी
उगा न मन गुंतते सांजतिरी
ओढ अनामिक जागे उरी
क्षण कापरे काहूरे भाव परी
मनी भ्रमराचा होय भासरी
मन झुरते नित्य नदीतीरी
काया कालची अलगाव करी
भाव मनीचा सांगे कथा भारी
क्षणाची नसती गिनती खरी
मनाची ओढ मनातच बरी

