STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Abstract Inspirational

4  

प्रतिभा बोबे

Abstract Inspirational

चिव चिव चिमणी

चिव चिव चिमणी

1 min
479

चिव चिव चिमणी 

आली माझ्या दारी

म्हणाली माणूस शहाणा

होईल का आता तरी?


सिमेंटच्या या जंगलात 

जीव माझा घुटमळतो आहे

मोकळा श्वास घ्यायला 

जागा मी शोधत आहे


अंगणात माझ्यासाठी

घास देणारी परी कुठे दिसत नाही

अंगणात धान्य निवडणारी 

माऊली घरातच व्यस्त राही


मोबाईलच्या लहरींनी 

जीव आमचा जातो आहे

मोबाईलवेड्या माणसा

तू का आमचा अंत पाहतो आहे?


वेळ अजूनही गेली नाही 

आम्हांला वाचवण्याची

नाहीतर तुमची चिऊ राहील

आठवण केवळ भूतकाळाची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract