STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational Others

3  

Rajendra Udare

Inspirational Others

चिऊ काऊ

चिऊ काऊ

1 min
248

चिऊ म्हणाली काऊ भाऊ

दोघे बाळाचे आई कडे जाऊ


प्रेमाने जाब विचारु आईला

बाळाला घासं भरते वेळेला


नादी लावायची पूर्वीचे काळी

गोडीने द्यायचीस तू आरोळी


आधी म्हणायची हातावरती

बोटे टेकवत करायची मस्ती


चिऊ चिऊ ये ...

काऊ काऊ ये ...


दाणा खा पाणी पी ...

अनं भुर्र दिशी ऊडून जा ...


आता बाळा खाऊ घालताना

दिसतेस आम्हास विसरताना


मोबाईल देतेस त्यांच्या हाती

सिनेमा गाणे मोठयाने लावती


ते ही संगीतात रममान होतं

ऐकताना ते थोड फार खातं


खाण्यास नकार देता म्हणे तू

खायच असेल तर खा बरं तू


रिकामटेकडी नाही मी खूप कामे आहेत बरं

खायचं तर खा नाही तर खुशाल उपाशी मरं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational