STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract

4  

Rohit Khamkar

Abstract

चिरेबंदी

चिरेबंदी

1 min
232

तू बनवलेल गलबत, केव्हाच किनारा सोडून गेलय.

असंख्य वादळ सोसून, मावळत्या सूर्या सोबत परत येतय.


सतत तुझीच आठवण, जिव्हाळा होता एवढा तुझ्याशी.

यायला उशीर झाला म्हणून, आता बोलणार नाही माझ्याशी.



माझ्या समोर मोठ होऊन, मलाही मोठे केलेस.

डोक्यावर छप्पर म्हणून, सतत उभे राहिलेस.



सगळ आठवतय अस वाटतय, जणू कालचाच प्रसंग.

कित्येक वेळ सोबत घातला आपण, मात्र आजही तूझा तोच रंग.



माझ्या परिवाराला सांभाळत होतास, तसा तूही एक परिवार जणू पालक.

कोसो मैल लांब गेलो, तरी भेटायला आलो परत पुन्हा चालत.



वाड्याच वय झालय की काय, एवढा शांत झालाय.

आम्हाला विसरायचा नाही, पण नवीन माणसात आलाय.



आज पुन्हा एकदा पाऊले फिरली, तूझ्या ओढीमंदी.

तसेच रुबाबात उभा होते, देखने रूप तूझे चिरेबंदी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract