STORYMIRROR

Rohit Khamkar

Fantasy Children

3  

Rohit Khamkar

Fantasy Children

चिमुरडी...

चिमुरडी...

1 min
79

पूर्वी वेळ काढायचो, आता मिळत नाही वेळ.

एका चिमुरडीच्या येण्याने आयुष्यात, बदलला सारा खेळ.


होते इकडे तिकडे सारे, जमणाय काही मेळ.

कधी कधी बोलणे खाण्याची, मग येते ती वेळ.

मग कधी सापडतो, कधी काढतो मी जाम पळ.

एका चिमुरडीच्या येण्याने आयुष्यात, बदलला सारा खेळ.


कित्येक आठवणीच्या फुलांची, जमलिया आता माळ.

काय होता तो वेळ, अन काय आला तो काळ.

अचानक जबाबदारीने, उरी लागला तो काय जाळ.

एका चिमुरडीच्या येण्याने आयुष्यात, बदलला सारा खेळ.


लोकांच्या समजण्यात, काय झाला असा तो घोळ.

विरुद्ध झाला समाज, जो माझाच होता टोळ.

परी होता आनंद जवळ, जसा मव्हाळाचा तो पोळ.

एका चिमुरडीच्या येण्याने आयुष्यात, बदलला सारा खेळ.


सारे आहेत समजूतदार, जरी गेला माझा तोल.

आपुलकीची माया सारी, झालर होती प्रेमाची खोळ.

विचार सतत माझ्या बाळाचा, आयुष्या तू कितीही पोळ.

एका चिमुरडीच्या येण्याने आयुष्यात, बदलला सारा खेळ.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy