Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Inspirational

3.4  

Neha Ranalkar

Inspirational

चिमणीचे घरटे

चिमणीचे घरटे

1 min
986


स्वैपाकाच्या खिडकीवर धुण्याच्या

दोरीवर आहे एक घरटे चिमणीचं |

पहाटेसच तिच्या येरझा-या गोड

चिवचिवाटाने झोपणं अडचणीचं | |१| |


एक एक काडी जमा करत बांधलं

चिमणा चिमणीने ते मेहनतीने |

 त्यांची लगबग,सततची धडपड 

घरटं बाधणं पिल्लांसाठी निगूतीने | |२| |


चिमणा चिमणी चतुर खरी तहान

लागण्यापूर्वीच विहिर खोदणारी | 

भविष्यातल्या धोक्यांचा वेध

घेऊन सुरक्षितता शोधणारी | |३ | |


पिल्लं अंड्यातूनं वर आल्यावर

त्यांची धावपळ नकाच विचारू |

चोचित इवल्या चिमणचारा घेऊन

पिल्लांना येता जाता लागे चारू | |४| |


पिल्लं मोठी होताच पंखात बळ

येता आकाशी जाती उंच उडून |

या चिमण्यांनो परत फिरा घरात 

म्हणताना मीच घेतो रडून | | ५| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational