STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

चिमणी-बालकविता

चिमणी-बालकविता

1 min
199

एकदा काय झाले 

चिमणी खूप फिरली 

झाडावरल्या घरट्यात 

रात्री जाऊन झोपली 


चिमणीचे कुटूंब मोठे 

चिमणा आणि पिल्ले 

रात्री सारे गोळा झाले 

शांत बिनघोर निजले 


पहाटेचे चार वाजले 

पूर्वला तांबडे फुटले 

चिमणा,चिमणी जागे झाले 

चिवचिव करून उठवू लागले 


भाषा त्यांची आगळी वेगळी 

पिल्ले सारी शिकू लागली 

शिस्त,संस्कार,संस्कृतीची 

शिकवण पिल्लांस मिळाली 


पिल्ले आई सोबत उठली 

चिवचिव करून जागे झाले 

आईसोबत खेळू लागले 

चोचीत चोच घालू लागले 


चिमणीने संदेश दिला 

उठा आता सकाळ होणार 

आळस झटका सारे आता 

रवि राजाचे आगमान होणार 


तसे सारे लवकर उठले 

उडण्यासाठी तयार झाले 

पंखात त्यांच्या बळ आले 

 स्वछंदी गगनी उडाले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract