STORYMIRROR

Smita Doshi

Romance

4  

Smita Doshi

Romance

चिमणचारा

चिमणचारा

1 min
260

हे असं का घडलं,कुणामुळे घडलं

असं घडायला नको होतं नं

आपलं नातं इतकं कच्चंहोतं का गं

प्रेमाच्या रेशमी बंधात बांधलेले आपण दोघे


असे कसे एकमेकांना दुरावलो

भलं मोठं कोडं पडलंय गं

सखे,तुलाही असंच वाटतं का गं?

आपल्या वेलीवरच्या फुलांसाठी तरी 


आपण एक व्हायला पाहिजे,

त्यांचा काय गुन्हा म्हणून त्यांना आपण ही शिक्षा देतोय

आपला इगो,आपलं भांडण

त्याचा त्यांना का भुर्दंड?


सख्या साजणा,

मला पटतंय तुझं म्हणणं

आपली चिमणी पाखरं कशी बावरलीत बघ

मम्मी-पप्पाशिवाय कशी केविलवाणीझालीत बघ


नाही पाहवत रे आपल्या पिलांकडे

आणखी एक।

खरं सांगू------

मीही नाही राहू शकत तुझ्या शिवाय

चल,आपलं भांडण आपण मिटवूया


पुन्हा एक होऊन संसार बाग फूलवूया

आपणच आपल्या घराचेआधारस्तंभ 

आपलं घर नव्याने बांधुया

आपल्या चिमणपाखरांना

सोन्याच्या मायेचा चिमणचारा भरवूया-----



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance