STORYMIRROR

Suhas Mishrikotkar

Inspirational

3  

Suhas Mishrikotkar

Inspirational

छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज

1 min
126

   दिन सोनियांचा उगवला

   अभेद्य पुरंदर किल्यावर

   शिवपुत्र संभाजी जन्मले

   जणू नशीबाचा दशावतार....१


   जन्मदात्या मातेचे झाले

  अचानकपणे निधन

   राजमाता जिजाऊंनी केले

   अत्यंत प्रेमाने संगोपन.....२


  अत्यंत देखणे अन शूर

  तेजोमय कारकीर्द त्यांची

  छत्रपती शिवरायांच्या नंतर

  धुरा सांभाळली स्वराज्याची.....३


  असामान्य व्यक्तिमत्व अन

  धनी अचाट व अलौकिक धैर्याचा

  अनेक भाषेंवर प्रभुत्वासह

  पराक्रम असामान्य शौर्याचा....४


  वर्चस्व विविध क्षेत्रात

  ठेवले कायम शंभूराजांनी

  पळायचे शत्रूंच्या तोंडाचे पाणी

  धर्मवीर संभाजींच्या कर्तृत्वांनी....५


  विविध कलेमध्ये पारंगत

  स्वराज्यरक्षक, धर्माभिमानी

  निपूण, कुशल संघटक

  होते अफाट बुद्धिचे धनी......६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational