छत्रपती शंभू राजे
छत्रपती शंभू राजे
राजे शिवाजी नि सईबाईच्या पोटी
शंभू राजे जन्मले पुरंदराच्या ओटी
राजे शिवाजीचा चालविण्या वारसा
दुसरे छत्रपती म्हणून उमटविला ठसा
विस्तार केला त्यांनी स्वराज्यासाठी
आपलेच वैरी झाले स्वार्थासाठी
ना कोणती भीती ना मृत्यूचे भय होते
औरंगजेबाला देखील जेरीस आणले होते
छोट्या वयात अनेक युद्ध जिंकली लढून
संकटाचा सामना केला डावपेच करून
हिंदू माझा धर्म कधी नाही सोडणार
मेलो तरी बेहत्तर धर्मांतर नाही करणार
छत्रपती शंभू राजे म्हणजे एक छावा
आज ही त्यांच्या नावाचा होतो गवगवा
वीर संभाजी राजेना मानाचा मुजरा
आठवणीत जन्मदिन करू साजरा
