छोटा भीम.(बालकविता)
छोटा भीम.(बालकविता)


बालमनाची गत लै भारी,
टीव्ही चा रिमोट लपविला,
छोटा भीम चा लागे प्रोग्राम,
आनंदित होई बालगोपाल.।।।१।।।
लागे प्रोग्राम टीव्हीवर,
जेवण पाणी न करी लवकर,
टूणटूण मावशीचे लाडू भारी,
भीम लाडू ला फस्त करी।।।२।।।
ढोलु भोलु उड्या मारे टूणटूण,
कालिया मागे पळत फिरी,
चुटकीने आणले लाडू सर्वाने,
ताव मारले खाऊन फस्त करी.।।।३।।।
जग्गु माकडाने केली कमाल,
उड्या मारल्या इकडून तिकडून,
झाडावरची फळे तोडून फेकून,
मारी कालिया ढोलु भोलु इकडून.।।।४।।।
राजा इंद्रवर्मा ने दिला फर्मान,
ढोलकपुर राज्याचा करू विकास,
छोटा भीम ने उचलला विडा,
राज्यात शत्रू ला न देऊ प्रवास.।।।५।।