STORYMIRROR

Deepali Mathane

Inspirational

3  

Deepali Mathane

Inspirational

छंद माझे

छंद माझे

1 min
232

छंद माझा आवड माझी 

जपलीय वाचन-लेखनात

जीवनी सूर छेडीत आनंदाचे 

छंद लपलाय गायनात

   तालावरी धरूनी ठेका

   मन रमतेय नृत्यछंदात

   रंग उधळूनी रांगोळीचे

   अंगणी बरसले रंग नादात

पाककलेची विशेष गोडी

दिसते चविष्ट पदार्थात

अगणित चटण्या कोशिंबीरी

ताट सजतेय छान थाटात

   जीवाभावाचे छंद म्हणावे

   जे समावूनी घेई आनंदात

   मन होऊनी निरागस छंदासंगे

   मज उंच-उंच नेई गगनात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational