छंद माझा... वाचन
छंद माझा... वाचन
प्रेरणा होऊन तूच तुझी
वाचनाचा धरी मना ध्यास
ज्ञान एक तारी जीवाला
नकोत व्यर्थ मग सायास..१
अपेक्षांचा भार नुसता
जो तो वाहे डोईवरी
निरपेक्ष भाव जो दुर्लभ
लाभे या ज्ञानसागरी...२
मोहवते मनास जी
निष्प्रभ करु पाहे नरजन्मा
डोंब वासनांचे पेटवून
चेतवी लख्ख चेतना...३
झेप घे या मुक्त अंबरी
ईप्सित जाण श्वासांचे
आव्हाने झेलण्या तत्पर हो
ज्ञानातच गम्य जीवनाचे...४
नवभूमीत रुजवत जा ना
बीज सकस वाचनाचे
आपसूकच तरारेल तेथ
रोप आत्मविश्वासाचे...५
आत्मसमृद्ध होता
तेजबिंदू ज्ञानाचा
जीवनाचे होईल सोने
मग मोह नको बघ राखण्याचा...६
खडतर पथ हा आयुष्याचा
क्षणक्षण असे कसोटीचा
ज्ञानरंग उधळीत कर प्रभा
पालटून तम निष्क्रियतेचा...७
देत चल श्वासांतावत
तू देणे लागतो सृष्टीचे
समाधानातच सुख खरे
कदाचित् हेच सार जीवनाचे...८
