चहा
चहा
त्याच्या सुगंधित सुवासाने मन प्रसन्न होत.
साखर चहा पत्त्ती अन वेलची चे अजब रसायन असत.
गरीब असो वा श्रीमंत,त्याच्या चाहता प्रत्येकजन.
मंद मंद गोड त्याचा सुगंध,उल्हासित होते तनमन.
असो गप्पांची मैफिल,वा असो चर्चा सत्र.
त्याच्या शिवाय फिके फिके ,मैत्रीण अन मित्र.
टपरी वरचा असो किंवा हॉटेल मधला खास
चहा नावाचा हा प्रत्येकाचा मित्र असे खास.
सुंगध याचा मनाला पार वेड लावतो.
लहान थोर साऱ्या ना आपल्या प्रेमात पाडतो.
पावसा सोबत चहा मस्त आहे हे कॉम्बिनेशन.
कोणी काही ही म्हणा,आम्हा लेखकांना याचच जास्त अट्रैक्शन.
सुमधुर वेलची आणि आल्याचा असा चहा गोड
याला नाही बघावा लागत वेळ काळ,चहाला नसतोच मूड़.
