चाफेकळी
चाफेकळी
सौंदर्याची खाण
परी मनाची
घायाळ करिते अदा नयनांची
मूक झाली वाणी
तू तर चाफेकळी.
अप्सरेची नाजूक जीवनी
मेनकेचे तेज लोचनि
सप्तसूर कोकिळेचे नाद उमटले स्वप्नी
तू स्वप्नांची स्वप्नसुंदरी
तू तर चाफेकळी.
तुज्या स्पर्शाने मन शहारले
तुझे हास्य पाहुनी ते ही हसले
लेखणीतून साकारलेली कामिनी
तू तर चाफेकळी.

