चाफा
चाफा
निष्पर्ण झाडाच्या फांदीवर ही डौलाने डुलतो
वाऱ्याच्या मंजूळ तालावर चाफा अलवार झुलतो
चाफ्याची मोहक अदा बहरूनी आज आली
प्रेमप्रियाच्या स्वप्नांचा तुजवीण कोणं वाली
उजळूनी निशेला खट्याळ आसमंत देतसे ग्वाही
चोरट्या चाफ्याने मंद-मंद दरवळल्या दिशा दाही
पुलकितं मनं फुलपाखरासम बहरूनीया आले
गंधकळ्यांना प्रीत फुलांना मोहरूनीया गेले
स्वप्नं थिजलेले पापणीतले चाफ्यासवे पाहले
तुजसवे कोमल प्रीतसरींच्या वर्षावात नाहले

