STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance

3  

shubham gawade Jadhav

Romance

चांदणीची वेडी प्रीत

चांदणीची वेडी प्रीत

1 min
125

जडली वेडी प्रीत चांदणीला

पौर्णिमेच्या मधुर चंद्राची

सुरवात होते इथून एका

नव्या सुंदर प्रेमाची


रोज रोज त्याला भेटून

सोबत आनंदाने चमकण

आवडत होतं तिला

त्याच्या आसपास राहणं


मंद प्रकाशात त्याच्या

रूप तीच उजळत होतं

आकाशात दोघांच्या प्रेमाचं

फुल उमलत होतं


दिवसेंदिवस चंद्राच

रूप होतं पालटत

म्हणून भेटण्या चंद्राला

चांदणी होती धावत


अखेर दिवस तो उजाडला

अमावस्येला चंद्र नाहीसा झाला

मंदावला प्रकाश चांदणीचा

नको असणारा दिवस विरहाचा आला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance