STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

चाचा नेहरू

चाचा नेहरू

1 min
759

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान

जवाहरलाल नेहरू या देशाची शान ।।धृ।।


बाल गोपाळांची त्यांना फार आवड होती

म्हणून सारे त्यांना चाचा नेहरू म्हणती

बाल जगतामध्ये त्यांना आहे फार मान ।।१।।


चौदा नोव्हेंबर आहे त्यांचा जन्मदिवस

बालदिन नावे साजरा केला जातो खास

फुल गुलाबी शोभे त्यांच्या खिशावर छान ।।२।।


स्वातंत्र्य संग्रामात नेहरू किती झिजले

देशासाठी त्यांनी आपले सर्वस्व वाहिले

सेवा केली देशाची बनुनी पंतप्रधान ।।३।।


शांतीची शिकवण त्यांनी दिली या जगाला

'शांतिदुत' हा मानाचा सन्मान मिळविला

देशावरती लिहिले त्यांनी पुस्तक छान ।।४।।


त्यांच्या कर्तृत्वाची सदैव आठवण ठेऊ

त्यांच्या जन्मदिनी त्यांना मानवंदना देऊ

ऐशा थोर नेत्यामुळे आहे देश महान ।।५।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational