STORYMIRROR

Kanchan Thorat

Abstract Tragedy Others

3  

Kanchan Thorat

Abstract Tragedy Others

बोन्साय

बोन्साय

1 min
186

बोन्साय प्रत्येक घरात असतात , 

दोन , तीन , 

नाही तर , एक तरी , 

क्षणाक्षणाला जमेल तेव्हा , 

छाटलेली असतात आत्मविश्वासाची मुळे . 


बनवून टाकलेलं असतं , 

कुंडीतल्या मातीसारखं , 

मर्यादित विश्व , छोटं , छोटं आणि अधिकच छोटं ! 

-करून वाढविलेले असतं , फक्त सौंदर्य ! 


सौंदर्य ? कसलं ? 

बोथट जाणिवांची झापडं लावून दिसणारं 

संरक्षणाच्या , संस्कृतीच्या नावाखाली रूजवलेलं 

असतं ; ते , केवळ - 

एखाद्या आईचं , बहिणीचं , बायकोचं ; किंवा 

एखाद्या मुलीचं बोन्साय !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract