STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy

3  

Rohit Khamkar

Tragedy

बोली लागते मताला

बोली लागते मताला

1 min
125

कोरं पानं लेखनीने भरताना, विचारांणा तमा नसावी.

गुलामीच्या बेड्या कधीच तुटल्या, तिथे स्वातंत्र्याची दुनिया असावी.


द्याव खुल ते आलिंगन, जाणत्या तअश्या सत्याशी.

फेकून द्यावी ती लाचारी, जी उपकारात बांधली उराशी.


छाती फोडून ओरडण्याची, गरज नाही सत्याला.

सरका सरकवी ज्यांनी केली, लागले सारे भत्याला.


लाच घेतो तेव्हा खुश, अनं देतो तेव्हा अन्याय.

बेईमानीशी आपलं नातं, स्वतः विचारतो काय.


चिढ येते मनाला, विषय निघाला असा.

असंख्य कोटी पाने भरली, लाज लाचेचा समंध कसा.


निर्लज्ज झालो आम्ही, विकतो आता स्वतःला.

स्वातंत्र्याला किंमत आली, बोली लागते मताला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy