बोल तर सही
बोल तर सही
तू सुखात रहा की दुःखात
दोन शब्द बोल तर सही,
हृदयात द्वेष असो की प्रेम
एकदा मन हलकं कर तर सही.
शब्दाने नाही तर इशाऱ्यात
जसं शक्य होईल तसं बोल तर सही,
ओठाने होत नसेल बोलणं
तर डोळे भरून पहा तर सही.
आदराने नको पण तिरस्काराने
मनातील दरवाजे खोल तर सही,
दूर राहून आग लागली काळजाला
जवळ येवून विझव तर सही.
नको तुझा पैसा गाडी बंगला
फक्त सुखरूप आहेस का विचार तर सही,
किती दिवस सैरवैर फिरशील
कधी माणसात बस तर सही.
