STORYMIRROR

Murari Deshpande

Inspirational

4  

Murari Deshpande

Inspirational

बोल लाडके बोल

बोल लाडके बोल

2 mins
229

करतो पूर्णच आज वादा

आजचा दिवस माझ्यासाठी

मुळीच नाही साधा

पत्नी दिवस म्हणतात याला

पर्वणी आहे मोठी


कौतुकाची आली गाणी

कितीतरी ओठी

हिंदी इंग्लिश की मायमराठीत

कुठले गाऊ सांग

थोडेतरी फेडीन म्हणतो

आज तुझे पांग


माझ्या सारखा अवखळ नमुना

तूच सांभाळतेस राणी

घर ठेवतेस सुगंधीत

होऊन अत्तरदाणी

प्रवास तुझ्या सोबतचा हा

मखमली केलास रस्ता


जाणतो मीही किती खाल्ल्यास

घरासाठी खस्ता

सगळंच काही बोलून आज

होईल कसं व्यक्त

आज आणलेला गजरा

बोलेल तुझ्याशी मनसोक्त


चतुर्थीचा उपवास आहे

हाही योगायोग

गप्पा मारूनच पोट भरू या

करू नवा प्रयोग

किती दिवस गप्पांचा

फड नाही जमला


राजा तुझा कामा मध्येच

नको इतका रमला

संसाराचे गणित अवघड

पण तूच शोधलेस सूत्र

म्हणून झालीस पत्नीपेक्षा

खरी जिवलग मित्र


शाबासकी आज दिलखुलासपणे

कर इकडे पाठ

विचार करूनच विधात्याने

बांधली आपली गाठ

तूच जानेमन तूच डार्लिंग

तूच माझी हनी

काय काय सांगू आज

खूप साचलंय मनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational