STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

बोल कोरोना बोल

बोल कोरोना बोल

1 min
242

बोल कोरोना बोल आता 

तू जाणार की न्हाय 

सर्व जगाने विडा उचलला 

तुला आता ठोकणार हाय 


तुझ्या भयाण महामारीने 

जग खूप त्रस्त रे झाले 

हात जोडून विनवणी केली 

तू नाही आमचे ऐकले 


भोग आता रे तुझ्या कर्माची फळे 

तुला एक,एक मारणार हाय 

सारे जग एक झाले

 तुझा नायनाट करणार हाय 


तुझी दहशत थोड्या दिवसाची 

लई दिवस चालणार न्हाय 

आता तू मुकाट गुपचूप 

पळून जाणार हाय काय 


आता तुला कोणीच सोडणार न्हाय 

बदला तुझाच घेणार हाय 

ज्याने तुला रे आता पोशिले 

त्यांची हार होणार हाय 


लसीकरण होणार हाय 

भीती तुझी जाणार हाय 

आता तुला कोणी घाबरणार न्हाय 

जग सारे खंबीर झाले हाय 


भीती त्यांची मनातली जाणार 

मग तुझे नामोनिशाण रे मिटणार 

तुझ्या नावाचा काळाबाजार 

सगळया जगात थांबणार हाय 


सर्व जग आनंदाने जगणार 

तुझी पायामुळे सारी आम्ही 


आता तुला धडा शिकविणार 

तुला आता उखडूण फेकणार 

सर्व जगाने निश्चय केला 

तुला आता भस्मसात करणार 


तू जगात जिवंत राहणार न्हाय 

तुला कायमची मूठमाती देणार 

तेव्हा तू एकटाच असणार 

संगती कोणी तुझ्या नसणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational