बोबडे बोल
बोबडे बोल
बोबडे बोबडे बोल माझे
सारे हसतात मला
पाहून माझी फजिती
सारे चिडवतात मला
बुक मध्ये लायन पाहिला
टीचरला गेलो सांगायला
टीचरला काहीच कळेना
सारे लागले हसायला
घरात कुणाशी बोलायची
सोय नाही सारे फक्त हसतात
बाबा आजी बघतात फक्त
दादा ताई बघ म्हणतात
डोळे माझे भरून येतात
काय करावे समजत नाही?
गुपचूप बसवेना माझ्याकडुन
बोलल्या शिवाय राहवत नाही
काय काय विचारुन विचारुन
सारे फक्त छळतात आई
माझे बोबडे बोल फक्त
तुलाच कसे समजतात आई?
