बंध
बंध
बंध प्रिय या नात्यातला
साथ सोबती निजमनाला
संग प्रिय या जीवनातला
उरे तो श्वास आयुष्यातला
रेशमी भाव तो बंधनातला
गोठ असशी तो मांगल्याचा
राग प्रिय तो संगीतातला
भाव उदगार तो मनातला
रंग इंद्रधनु त्या नभातला
छंद पावसाळी या ऋतूचा
क्षण आभासिक क्षितिजाला
गवसणी घाली या मनाला
रित स्वप्नांची चित्र पापणीला
ओढ अनमिक ती अंतरीला
बंध रेशमी कळे भावनांना
गंध सुगंधी जडे मोगरयाला
प्रित अशी कळे का फुलाला
अंकुरता तो बहर प्रितीतला

