STORYMIRROR

Swapna Sadhankar

Romance Classics

3  

Swapna Sadhankar

Romance Classics

बंध

बंध

1 min
215

काल जी जाणवली

ती तुझी अस्वस्थता

तगमग तुझ्या मनाची

आणि अंतर्मनाची भाषा


वाटली अर्धवट मला मी

न होती स्थिरता

कुजबुज मनाची

घेराव भयाण शांतता


तुला न कळली

न कळली मला

परी कशी उमजली

तुझी ती व्यथा


तुझ्या मौनातही

खेचते बंधाची गर्ती

तुझा सहवास जोवरी

असेल जीवन अर्थी


तुझ्या विना काया माझी

फक्त एक मूर्ती

नसेल माझा वास तुझ्या मनी

होईल ना जीवन पूर्ती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance