बंध वेगळा...
बंध वेगळा...
प्रेमासवे श्वास माझा
बाळा तुझ्यात गुंफला
तुझ्या माझ्या या नात्याचा
आहे बंधच वेगळा
पहिल्यांदा मला जेव्हा
तुझा स्पर्श जाणवला
कुठूनसा येत राही
अंगी शहारा कोवळा
आठवतो आजही तो
मला संवाद आपला
शब्द शब्द ध्यानी माझ्या
आहे अजून सगळा
अनुभूती अनोखीच
अन् नुर पालटला
तुझ्या येण्याचा लेकरा
होता आनंद सोहळा