STORYMIRROR

savita Dhakne

Drama Others

4.0  

savita Dhakne

Drama Others

बंध रेशमाचे

बंध रेशमाचे

1 min
15K


श्रावणी नारळी पौर्णिमा,

सण हा मोठा उत्सवाचा,

बंधू करी बांधूनी राखी,

वाढवू गोडवा बंधूप्रेमाचा.


भाऊ बहीणीचे अतुट नाते,

माया, ममता अन् प्रेमाचे,

रक्षाबंधनाच्या पवित्र क्षणी,

दृढ होती हे बंध रेशमाचे.


लाविते जीव भ्राता जीवनी,

ताई तर कधी बनून आई,

बहीणीसारखे निरपेक्ष प्रेम,

जगी दुसरे मिळणार नाही.


लाभो भाऊराया दीर्घायुष्य,

बहीणीची असे सदा कामना,

राहो बंधुराज सदैव तत्पर,

आयुष्यभर भगिनीच्या रक्षणा.


'राखी' म्हणजे रक्षण कर,

'बंधन' म्हणजे नात्याची गुंफण,

देऊनी सकला एकच संदेश,

करु साजरे हे 'रक्षाबंधन'.


भाऊ बहीणीचे पवित्र नाते,

स्नेहाचे असो वा रक्ताचे,

टिकवू प्रेम अन् जिव्हाळ्याने,

अमृततुल्य हे बंध रेशमाचे.


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Drama