बलीदानाचा बदला घ्याच
बलीदानाचा बदला घ्याच
बलिदानांचा सूड घ्याच
शहिदांचे, रक्त सांडे,बघत राही मायभूमी!
ऐकताची, बातमी ती, स्तब्ध झाली मायभूमी!! 1
थांबवा ते, फार आता,खुप ते धिक्कार झाले!
रडत आहे,देश सारा,अश्रु ढाळी, मायभूमी!! 2
क्रोध दाटे, अंतराती,भावना उद्वेग झाला!
घ्याच बदला,सैनिकांनो, सांगती ती , मायभूमी !! 3
पाकड्याला, ठेच आता,सांगती,सारे जने ही!
हाथ कां बांधे, कळेना, वार झेली, मायभूमी ! !4
ओंजळी, भरली फुलांची,वाहतो स्मृतीस त्यांच्या!
अस्मितेवर,काल जेव्हा, घाव झेली, मायभूमी !! 5
"अनिल" सांगे, संयमाने,वागलो, कायम तरीही,
दु:ख आता, सोसवेना, भ्रांत झाली, मायभूमी !! 6
