STORYMIRROR

Vijay Sanap

Drama

3  

Vijay Sanap

Drama

बळी पिकवितो मोती

बळी पिकवितो मोती

1 min
14.2K


एकादशी न आषाढी

बांधावर वाचे पोथी

पाणी भरुन घामाचे

बळी पिकवितो मोती ।।


त्याच्या नांगराचा फाळ

जणू अभंग बोलती

जीव रमून कामात

बळी पिकवितो मोती ।।


नाम मुखी विठ्ठलाचे

चाले पाथीवर पाथी

काळी माय ती पावता

बळी पिकवितो मोती ।।


टीचभर पोटासाठी

जोडी माती संगे नाती

पेरी भूईत सपान

बळी पिकवितो मोती ।।


साल येईन रे कसं

नाही मनामधी भिती

राणी घालती रे पाणी

बळी पिकवितो मोती ।।


तुक्या तुहे रे अभंग

गातो मी माळावरती

कर ओली काळी माती

बळी पिकवितो मोती ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama