Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Medha Desai

Inspirational

3  

Medha Desai

Inspirational

भय

भय

1 min
327


भय किंवा भीती माणसाची

नेहमी शत्रूच होऊन बसते

म्हणूनच खंबीरपणे राहण्याची

माणसाने सवय करून घ्यायची असते १


आत्मविश्वास हा माणसाला नेहमी

मनाने कणखर बनवत असतो

तेव्हा तावूनसुलाखूनच सर्वांचा

जीवनात सामना करावा लागतो २


काही लोकांना तर पाण्याचीच

भीती पार अगदी जन्मभर सतावते

पण हळूहळू मनाचा हिय्या करत पाण्यात उतरून

ती भीती माणसाला दूर करावी लागते ४


जायंट व्हील,१०व्या मजल्यावर गेल्यास

कुणाला गरागरा चक्करच येत राहते

असे वेगवेगळे फोबीया माणसाला असल्यास

तेव्हा ती उंच जागेची भीती असते ५


माणसाच्या भीतीचे कारण लक्षात आल्यास

त्यावर कायमची उपाययोजना करता येते

पण सतत कुणाला घाबरट म्हटल्यास

माणसाला ती गोष्ट न्यूनगंडाकडे नेते ६


म्हणूनच भीती वाटणाऱ्या माणसाला

अजूनच न घाबरवता त्याला धैर्य द्यावे

त्याचे सतत मनपरिवर्तन करत राहून

त्याच्या मनातील भय कमी करत रहावे ७


आनंद,दुःख,भय सर्व मनातील भावना 

प्रत्येक माणसामध्ये घर करून असतात

संकटाचे भय मात्र प्रत्येकालाच असते

पण त्यातूनच सुलभ मार्ग काढावे लागतात ८


Rate this content
Log in