भय कलियुगचे
भय कलियुगचे
भय वाटते आज नात्याचे
सरतेय त्यातली माणुसकी
लोप पावतोय त्यातला लळा
नाही राहिली माणुसकी
भय वाटते आज भविष्याचे
मिटेल का कधी गरिबी
लाचारी पाठ सोडेणा
सुख कधी येईल नशिबी
भय वाटते आज तंत्रज्ञानाचे
भूलवलेय त्याने समाजाला
सगळेच करी पाठलाग त्याचा
नाही वेळ संवाद साधायला
भय वाटे आज स्पर्धेचे
युग आले शर्यतीचे
जीव घेणा खेळ सारा
मापन होते गतीचे
भय वाटते आज वैरत्वाचे
नाते पाळत नाही बंधने
उडालाय विश्वास सत्यावरचा
मन भरलेय इर्षेने
भय वाटते आज स्वरक्षनाचे
भीते मन मुक्त वावरायला
कलीयुगाचे सावट सारे
चाड ना उरली वागण्याला