भूक आणि लॉकडाउन
भूक आणि लॉकडाउन
(कोरणा काळातील परिस्थितिवर आधारीत)
खरंच साहेब आता
लोकडाऊन नका करू
गरिबांच्या भुकेशी
पुन्हा नका खेळू
तुमचं काय नाश्त्यामध्ये
तुम्ही काजू बदाम खाता
गरिबांच्या पोह्यामध्ये तर
शेंगदाणे ही नसतात
साहेब तुम्ही भुकेची झळ
नाही हो सोसली
पण आम्ही उपाशी पोटी
रात्र रात्र जागून काढली
लाॅकडाऊन असलं की
हाताला काम नसतं
भुकेलं लेकरू बघून
काळजात चर्रर्र होत
तसतर भुकेने रोज मरू
करोनाने तर एकदाच मरू
साहेब खरंच आता
लोकडाऊन नका करू
