STORYMIRROR

Pratibha Vibhute

Inspirational

3  

Pratibha Vibhute

Inspirational

बहुगुण कडुनिंब

बहुगुण कडुनिंब

1 min
135

जागोजागी उभे वृक्ष

आरोग्यदायी कडुनिंब

छाया देतात सर्वांना

आरोग्यदायी प्रतिबिंब...१!


कडुलिंबाचे जाणावे तुम्ही

आरोग्यासाठी आहे महत्व

धार्मिक सण पाडव्याला ही

उपयोग करी जाणोनी तत्व...२!


चमडीचा आजार,मूळव्याध

बहुगुणी कडुनिंबाची पानं

गोवर,कांजण्या पानावर झोपा

पाण्यात टाकून वापरा सोनं...३!


पोटफुगी,अपचन,पित्त होता

लिंबाची पाने खावी ताजी

वाळलेला पाने धान्य साठवण 

करण्यास वापर सांगते आजी...४!


विविध साबण,दंतमंजन

वापर होई सौंदर्य प्रसाधन

शरीरातील उष्णता कमी

बहुगुणी लिंबाचे वाढवा वन...५!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational